Saturday 16 June 2018

हॉल्ट स्टेशन:

हॉल्टस्टेशन: 


"... मृण्मयी, जरा सोफ्यावरचं वॉलेट आणि कार किज् खाली घेऊन येनं लवकर!" इतकंच बोलून उदयने फोन कट केला आणि बिल्डिंगच्या खाली मृण्मयीची वाट पाहू लागला. ३-४ मिनिटातच मृण्मयी पीठाने भरलेल्या हातात वॉलेट आणि कार कीज् घेऊन खाली आली. "...अजून काय साहेब.?" असं खोचक आवाजात विचारत तिने वॉलेट आणि कार कीज् उदयला दिल्या. "...नाही, फक्त हेच राहीलं होतं! चल बाय सी यू बडी!!"
"थांब, हा घे रुमाल; हा पण विसरला होतास."  " ओह्ह थँक्स, चल निघतो!!" असं म्हणत उदयने निरोप घेतला.

खरं तर हे सगळं मृण्मयीला काही नवीन नव्हतं, आठवड्यातून ४ दिवसतरी उदय काहींना काही विसरत असे, आणि मृण्मयीला हातचं काम सोडून खाली जावं लागे. या सगळ्याची मृण्मयीला आता सवयही झाली होती.

उदय एक चाळिशीतला हुशार आणि विचारवंत, पण स्वभावाने खूप आळशी होता. गेली १८-२० वर्ष सरकारी सार्वजनिक बांधकामखात्यात एका मोठ्या हुद्यावर कार्यरत होता. अर्थात त्याच्या लठ्ठपणाचं आणि आळशी स्वभावाच हेच एक कारण असावं!! हा:हा:हा:...

मृण्मयी उदयची पत्नी, महिलामंडळाची अध्यक्ष आणि एक कुशल गृहिणी होती. दोघांची पहिली भेट कॉलेज  पार्किंगमध्ये झाली होती आणि त्या भेटीचं रूपांतर चारच वर्षात शुभमंगल सावधान मध्ये झालं. अर्थातच त्यांचं love-marriage होतं. आज १४-१५ वर्ष झाली पण दोघेही पैसा आणि पोसिशनमागे पळणारे असल्याने कुटुंब वाढवण्यात त्यांना फारसा रस नव्हता. किंबहुना दोघेही स्वावलंबी आणि फास्ट लाईफ जगणारे...

मृण्मयीचा अधिकसावेळ महिलामंडळाच्या मिटींग्समध्ये तर साहेबांचा बहुतेकसा वेळ ऑफिस आणि नवं-नवीन पदार्थ खाण्यात जायचा. उदय उत्तम खव्वय्या होता, आणि त्यातूनच वेळ उरला तर TV आहेच.! तासंतास TV  पाहणे हा त्याचा छंदच जणू... दोघांचंही आयुष्य कसं  खुशल-मंगल चाललं होतं. माणूस ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर धावाधाव करतो ती गोष्ट साधारणपणे वयाच्या ४०-४५ पर्यंत मिळवतोच. साधारणतः तसेच पोसिशन आणि आर्थिक सुबत्ता दोघांनीही मिळवल्या होत्या. आता त्या फक्त टिकवणं आणि एखादा रिटायरमेंटचा मस्त प्लॅन करणं इथपर्यंत वाटचाल आली होती.

... पण बहुतेक सृष्टीला काही हे मानवलेलं नव्हतं. अर्थात सृष्टीच्या मनात काय चालतं हे कोण जाणे!! - म्हणे सगळं विधीलिखित आहे.

एका तीव्र-अतितीव्र  हृदयविकाराच्या झटक्याने उदयच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीला पूर्णविराम दिला होता. उदयच्या डेडबॉडीकडे पाहताना मृण्मयीचे डोळे पाणावले होते, चेहरा निस्तेज होऊन कसल्यातरी गहन विचारात गेल्यासारखी एकटक ती त्याच्या डेडबॉडीकडे पाहत होती.  कदाचित फास्ट पळत आलेली लाईफ आणि एकमेकांना पुरेसा न दिलेला वेळ तिला जुन्या आठवणीत घेऊन गेला असावा...

 मघाशीच म्हंटल्याप्रमाणे सृष्टीचं मन आणि विधीचं विधान यांची विसंगती कोणालाच उलगडलेली नाही. उदय तरी त्याला अपवाद कसा असणार...!!!

डोळे उघडताच उदयला आपण कोणत्यातरी भयंकर लांब रांगेत असल्याचा साक्षात्कार झाला. मंद प्रकाश - धूसर वातावरण, दूर-दूर पसरलेली धुक्यांची वादळं, कसल्यातरी भयाण वास्तूत असलेली अस्वस्थता आणि त्यातूनच कुठूनतरी लांबून एका भव्यशा घंटेचा परावर्तित होणार आवाज उदयचे कान बधिर करणारा होता. आणि उदय ज्या रांगेत उभा होता ती रांग वळणं-वळणं घेत कुठल्या तरी प्रचंड भव्य वास्तूमध्ये जात असल्याचं चित्र उदय पहात होता.

उदयने पाहिलं, रांगेत असणाऱ्या माणसांची reaction अगदी त्याच्या सारखीच प्रश्नार्थक होती पण जणू कोणी एकमेकांशी काहीच विचारणा न करताच रांगेत पुढे पुढे सरकत होते. उदय ला काही सुचत नव्हतं काय चाललं असावं हे..?  त्याने मृण्मयीला हाक मारल्या सारखं केलं, आठवण्याचा प्रयत्न केला कि, कदाचित जास्त वेळ  TV पहातो म्हणून मृण्मयीनेच तर कुठल्या हॉरर मूवी- शो मध्ये त्याला आणलंतर  नाही ना ...? त्याने हजारदा मनात निश्चय केला कि, मृण्मयी मी TV जास्त वेळ नाही पाहणार पण या हॉरर- शो मधनं मधनं निघून जाऊ आपण...!

खूप आठवण्याचा प्रयत्न केला कि, मृण्मयीने आपल्याला नक्की आणलं तरी कधी..? काहीच का नाही आठवत आपल्याला आणि ती आहे तरी कुठे...? आठवून-आठवून त्याला मृण्मयीने वोलेट आणि कार कीज्  खाली आणूनदेण्याइतकच आठवत होतं आणि मग ऑफिस मध्ये जाऊन भरपेट केलेला लंच आणि त्यानंतरची साईटव्हिझीट ची मीटिंग त्याला आठवली. इतक्यातच उदयला रांगेची सांगता झालेली असून एका विशाल प्रवेशद्वारापलीकडे एक भव्य घंटा असल्याचं त्याने पाहिलं. मघशीपासून सतत परावर्तित होणाऱ्या त्या घणाघाती घंटेच्या आवाजाचा उलगडा उदयला झाला. " I HOPE, या सगळ्याचा उलगडा पण लवकरच होईल." असं म्हणत त्याने प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला.

आत प्रवेश करताच उदयचे पाय थर-थर कापू  लागले कारण आतील सारंच काही अधांतरी होतं. सगळंकसं हवेवर तरंगणारं, मधूनच कुठूनतरी येणारी हवेची झुळूक उदयच्या कानात वादळासारखा आवाज करणारीशी  भासत होती.  काजव्यांसारखी किंबहुना त्याही पेक्षा तेजस्वी चमकणारी चतुर पाखरं सर्वत्र घिरट्या घालत होती. आकाशातले सर्व तारे अगदी लक्ख चमकत होते. वातावरण काहीसं प्रसन्न मात्र पूर्ण प्रश्नार्थक होतं.

इतक्यात एक भारदस्त आवाज झाला, "पुढे हो उदया ओळ अनंत आहे" मघापासूनची घंटानादाने उदयच्या कानाला आलेली बधिरता एका क्षणात उडून तीचं भयभीततेत रूपांतर झालं...!! "ओह, हा जर का कुठला मृण्मयीचा हॉरर-शो वैगेरे असला तर मात्र मी तिची चांगलीच शाळा घेईन आणि तिला सांगेन कि मला नाही आवडत असा फाजीलपणा...!!" इतक्यात दुसऱ्यांदा आवाज झाला, " उदया मी एकदाच बोलतो, पुढे येऊन या कटघरात  उभा रहा, तुझ्या सर्व शंकांचं निरसन क्षणात दूर होईल." उदयनं थोडं धीरानं घेत उंचावर असलेल्या कटघराकडे आपली पाऊले वळवली. मोठी हिम्मत करून त्याने प्रश्न केला,

 " हे सगळं नक्की आहे तरी काय आणि आपण कोण..? आणि कुठनं बोलताय ? मृण्मयी कुठयं ?.." क्षणभराचाही विलंब न लावता, एक विलक्षण अशी व्यक्ती तिच्या भारदस्त स्वरात प्रकटली आणि म्हंटली,

 " मी 'चित्रगुप्त' तुझ्या सगळ्या शंकांचं निरसन करण्यास सांगतो कि, एका हृदयविकाराच्या झटक्याने तुला जीवनप्रवास संपला असून तू आता तुझ्या जगापासून आणि मृण्मयीपासून दूर आला आहेस, इथे तुझ्या जीवनातल्या सर्व कर्माची पडताळणीकरून तुझी अंतिम शिक्षा ठरवण्यात येईल. तुझ्या सर्व कर्मांची लिखिते आपल्याकडे संग्रहित आहेत. तू हे सत्य पचवलंस कि आपण आपल्या कामकाजाला सुरुवात करू..."

उदयच्या कानावर पडणारे किंबहुना कानात घुसणारे ते तीव्र स्वर ऐकून उदय भंडावून गेला होता, नक्की कसं व्यक्त व्हावं हे त्याला समजतच नव्हतं. अर्थात सगळ्यांचीच स्थिती हि अशीच होत असेल, कदाचित म्हणूनच तर 'चित्रगुप्ताने' उदयला हे सत्य पचवण्यासाठी थोडा वेळ दिला असावा ...!!

 उदयला त्याच्या लहानपणी पाहिलेल्या 'रामानंदसागर' यांच्या मालिकांची आठवण होऊ लागली. उदयला तर विश्वासच बसत नव्हता कि तो अस्थित्वातच नाही याचा. त्याने स्वतःला एक जोराचा चिमटा काढला... कदाचित मृण्मयीचा हॉरर-शो किव्वा एखादं स्वप्नतर नाहीना हे...!!

सर्वपडताळण्यांनंतर उदयच्या मानाने मान्य केलं कि, हे एक वेगळं जग असून त्याची मृण्मयी त्याच्या सोबत नाही. त्याचा खरोखरच मृत्यू झाला असून तो त्याच्या सर्व कर्मांची शिक्षा वैगेरे-वैगेरे....!!

सभोवतालचं सगळं वातावरण पचवून उदयने प्रश्न केला, "...मग माझ्या मृण्मयीच काय? कसं होणार तिचं, एकट्याने कशी जगणार ती? माझी सवय आहे तिला."


यावर आवाज झाला, " उदया सवयीनांपण कालांतरं असतात, काहीकाळ तिला तुझी सवय होती पण अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीची ती तरी किती सवय ठेवणार. तूला मरून १४ वर्ष उलटलीयेत. आठवतंय ? मी म्हंटलं होत पुढे हो ओळ अनंत आहे म्हणून..."

उदय खूप अचंबित होत होता, त्याच्या मरणाला १४ वर्ष झालेयत यावर तर त्याला विश्वासच बसत नव्हता. तो उभा असलेली माघाशीची वाटणारी रांग १४ वर्षांपासून चालत आलेय आणि त्यारांगेत असणार सगळी माणसंही उदय सारखीच मृत असून त्या माणसांना अजून यासर्वाची कल्पनापण नाही!! उदयच्या डोक्यात विचारांची वादळं वाहत होती. उदयचं  जग हे एकाच दिवसात त्याच्यापासून १४ वर्षांनी लांब गेलं होतं आणि थक्क होऊन तो त्याकडे पाहत होता.

" होय, उदया हेच सत्य आहे! आणि हे सत्य एक ना एक दिवस सगळ्यांनाच पचवावं लागत, आणि हीच ती जागा, हेच ते तुमच्या भाषेतलं "हॉल्ट स्टेशन" जिथे तुम्हाला तुमच्या सर्व कर्मांची पडताळणी करून तुम्हाला स्वर्गात पाठवायचं अथवा नर्कलोकात पाठवायचं हे ठरवण्यात येतं." ...आकाशवाणी होतच होती..

एकंदरीतच्या सगळ्या स्पष्टीकरणातून उदय थोडा शांत झाला होता मात्र मृण्मयीची काळजी त्याला अस्वस्थ करत होती, ती व्यक्त केल्यानंतर त्याला साक्षात्कार झाला कि, सुरुवातीला मृण्मयी कोलमडून गेली होती पण तिने स्वतःला सावरत महिला मंडळातून निवृत्ती घेऊन आपली 'टूर अँड ट्रॅव्हल्स' ची कंपनी सुरु केली असून तिने उदय शिवाय किंबहुना उदयच्या सवयिंशिवाय जगायला शिकली होती, हे जाणून उदयला खूप मनशांती मिळाली.

थोड्याच वेळात उदयच्या कर्मपडताळणीला सुरुवात होणार होती, आयुष्यभर चित्रपट आणि पुस्तकांमध्ये पाहिला-वाचलेल्या यमाचा समक्ष-साक्षात्कार उदयला थोड्याच वेळात होणार होता. एव्हाना उदयलाही  या वातावरणाची सवय झालीच होती.

पृथ्वीवर अचानक ढग गडगडून विजा जशा चमकतात आणि अधून-मधून लक्ख प्रकाश जसा पडतो तसा लख्ख प्रकाश दूरपर्यंत गेलेल्या त्यापायऱ्या-पायर्यांच्या रस्त्यावर पडत होतात्याच रस्त्यावरनं अचानक मंद-मंद प्रकाशातून एक विक्राळ प्राणी मोठ्या आवेगाने दौडताना उदयनेे पाहिलाउदयला आता इतकीशीहि भीती उरली नव्हतीते म्हणतात ना 'मेलेलं कोंबडं आगीला भित नसतं...' तशीच काहीशी अवस्था उदयची झाली होतीपाहता-पाहता तो विक्राळ प्राणी म्हणजे एक अवाढव्य रेडा आणि त्यावर बसून येणारा तो 'यमउदयने उभ्या आयुष्यत आतापर्यंत पहिला नव्हताउष्ण-वर्णतापट भावतीक्ष्ण नजर आणि सभोवताल भस्मसात होईल की काय असं तेज एका विशाल रेड्यावर बसून वेगाने उदयच्या दिशेने पळत होतं.

समोरा-समोर झाल्यावर नक्की नमसकार करावा कि इतरवेळी मीटिंगला शेकहॅण्ड करतात तसं औपचारिक स्मितहास्य करावं हे उदयला समजत नव्हतंशेवटी निर्विकार होऊन पुढच्या प्रक्रियेची वाट पाहावं असं उदयने ठरवलं..!!

'चित्रगुप्तानेयमाकडे आदराने पाहून 'महाराजअसं म्हणून वंदन केलंउदयसाठी हे सगळं कसं एक मूव्ही सारखं चाललं होतंमुळातच ४० वर्ष TV, मूव्ही याची आवड बाळगून मेल्यानंतरपण १४-१५ वर्ष प्रत्यक्ष मूव्हीमध्येच काम करण्यासारखं वातावरण झेलल्या नंतर नकळतच उदय हे सगळं एका नव्याच curiosity ने पाहत होता आणि एकंदरीत हे सगळं कोण्या फिल्म डायरेक्टर ने डायरेक्ट केलं नसून चक्क प्रत्यक्षात आहे याच नवल उदयला वाटत असावं...!

पुढे 'चित्रगुप्तानेउदयच्या कर्माची कहाणी वाचण्यास सुरुवात केलीअगदी त्याच्या उदयपूर्वीच्या जन्मापासनंत्यांच्यानुसार उदय हा मागच्या जन्मी एका गायीचं वासरू असून कुठल्यातरी मंदिराबाहेर लोक त्याला चारा घालत असत वैगेरेवैगेरे...
यानंतर तो मनुष्य जन्मात येऊन उदय बनलात्याचा जन्मबालपण या सगळ्या कहाण्यांना सुरुवात झालीचित्रगुप्त उदयच्या अख्या आयुष्याचा पाढा वाचत होते तसा उदय त्याच्या त्या-त्या आठवणीत जाऊन त्या आठवणींचा अनुभव घेत होतात्याच्या शाळेतल्या गोष्टी>> आठवीत पास होऊन नववीत गेल्याचा आनंद...ते वाटलेले पेढे... कॉलेजचा पहिला दिवस... मृण्मयीपूर्वींची लफडी... मृण्मयीची भेट लग्न आणि मृत्यू दरम्यान केलेली सगळी कर्म...अगदी सरकारी खात्यात लागलेली नोकरी आणि घेतलेली पहिली लाच वैगेरेवैगेरे
सर्व पडताळणी अंती निर्णय घेण्याची वेळ येताच उदयची उत्कंठता शिगेला पोहोचली कारण अंतिम निर्णय हा 'यमदेणार होते.

...आणि यमाचा आवाज- "उदया तुझा एकंदरीत जीवनप्रवास पाहता तू फारशी कारस्थानं रचली नसलीस तरी कोणाचं उदारहाताने स्वागतही केलेलं नाहीयेसदान-धर्म करताना देखील तुझ्या मनात त्यातून मिळणारं समाधान यावरच तुझं मन केंद्रित केलसमुद्दामहून कोणाला दुखावलं नसलस तरी स्वतःच्या पदाचा वापर करून लाच घेण्यासारखी स्वार्थी कामं केलीससतत धन आणि उच्चपदामागे राहून ते सगळं मिळवलंस खरं पण त्यासाठी खास कष्ट केले नाहीसस्वतःअशी काही अंगमेहनत तू कधीच केली नाहीस....
तर या सारांशावरून,चित्रगुप्ता काय जन्म ठरतात याचे..?"


अंतिम निर्णयाच्या आतुरतेने टवकारले उदयचे कान यमाचे शब्द-नि-शब्द अगदी बारकाईने टिपत होतेउदयला खोलवर कुठेतरी आनंदही होत होता कि आपण जे मिळवायचं होतं ते मिळवलचपण  त्यासाठी कोणाला फारसं काही दुखावलं नसून दान-धर्म पण केली आहेत मग ती भले फळाची अपेक्षा बाळगून केलेली असेनात की...!! अगदी मेलेला माणूससुद्धा किती Optimist असू शकतो याचं मेल्यांनतरच जिवंत उदाहरण म्हणजे उदयच होता..!!

यमाच्या प्रश्नावर खोल विचार करून चित्रगुप्ताने दोन जन्म सुचविले >> 'गर्दभ किंवा पिपीलिका'
उदयला हे दोन नक्की काय आहेत हे लक्षात  आल्याने -राहून त्याने विचारणा केली>> "व्हाट्स धिस पिपीलिका अँड गर्दभ??"

यावर 'गाढवकिंवा 'मुंगीयापैकी एका जन्मात आपण जाणार याच उदयला न्यात झालं.

यमाचा आवाज>> "एकंदरीत उदयने केलेल्या कर्मांवरून त्याच्या बुद्धी विषयीची शंका माझ्या मनात नाहीत्यामुळे या दोन्ही जन्मात त्याला कष्ट आणि धावपळ करावीच लागणार असून 'पिपीलिकाहा उदयचा पुढचा जन्म असेल हे मी जाहीर करतो." असं म्हणून यमाची पाठमोरी आकृती उदयला दिसली.


सोफायनली उदय मुंगीच्या जन्मात जाणार होता आणि त्या प्रक्रियेला सुरुवात होणार होतीया प्रक्रियेचाच एक भाग म्हणजे पूर्वीच्या जन्माची आणि 'होल्टस्टेशनवरील स्मुर्ती नाहीशा करणेसोस्मुर्ती नाहीशी करण्याची प्रक्रिया चालू असतानाचतो प्रवेशद्वार जिथनं उदयने आत प्रवेश केला होता त्या प्रवेशद्वाराशी काहीतरी गदारोळ चाललाय अशी खबर चित्रगुप्ताकडे आलीतस समजताच चित्रगुप्त नक्की कसला गदारोळ आणि तो थांबवण्यासाठी त्या दिशेने निघून गेलेते परतल्याननंतर उदयला समजलं कि कोणीतरी एक मोठा नेता तिथे आला असून (मृत्यूनंतरतो अजूनसुद्धां इलेक्शनचा प्रचार करत होताउदयला त्या नेत्याच्या Optimistपणाची कीव वाटत होती...

सोसर्व प्रक्रिया पूर्णझाल्यावर आता उदय 'मुंगीया त्याच्या नवीन जन्मात जाण्यास सज्य होताअर्थात सद्यस्तिथीत तो बेशुद्ध अवस्थेत होता मात्र लवकरच त्याचा जन्म थेट मुंगीच्या घरात म्हणजेच कोणत्यातरी वारुळात होणार होता...!!


समाप्त


 आभाळसांज 

- मंगेश मिलिंद हरवंदे 


सुटकेचा नि:स्वास अनुभवण्यास क्लिक करा. 



















No comments:

Post a Comment